#वडवणीत फर्निचर दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे.आग लागल्यानंतर अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते.मात्र अग्निशामक दल वेळेवर उपलब्ध झाले नसल्यानं नागरिक हतबल झाले.आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.तालुक्यातील नगरपंचायतीमध्ये नादुरुस्त अग्निशामक गाड्या असल्याने तारांबळ उडाली होती.अखेर माजलगाव ,बीड या ठिकाणाहून गाड्या बोलवण्यात आल्या. मात्र तोपर्यंत दुकानदाराचे लाखोंचे नुकसान झाले.